मुख्य कंपनी आणि उपकंपन्यांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे अर्ज

अ.क्र. मुख्य कंपनी आणि उपकंपन्यांची नावे कंपनी कोणासाठी योजना
०१ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मयार्दित) मुख्य कंपनी VJ/JNT/SBC ऑनलाइन अर्ज
०२ राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी रामोशी समाज ऑनलाइन अर्ज
०३ पैलवान के. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी वडार समाज ऑनलाइन अर्ज
०४ ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद महाराज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी लोहार समाज ऑनलाइन अर्ज
०५ श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी गवळी समाज ऑनलाइन अर्ज
०६ विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी विणकर समाज ऑनलाइन अर्ज
०७ श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी नाथपंथीय समाज (नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, भराडी जोगी, किंगरीवाळ, मरीआईवाले, बहुरूपी, गोसावी, समशान जोगी, बाळसंतोषी किंगरीवाले, गोंधळी, डोंबारी, चिडकुब्धी) ऑनलाइन अर्ज

अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन

ऑनलाइन तसेच जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज सादर करताना आवश्यक चरण समजून घेण्यासाठी खालील दुवे पाहा:

महत्वाच्या सूचना

  • अर्जदाराचा जात दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि आधार क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक.
  • कर्ज प्रकरणासाठी निवडलेला प्रकल्प व्यवहार्य असल्याची खात्री करून प्रकल्प अहवाल तयार ठेवा.
  • महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) मिळाल्यानंतरच बँक प्रक्रियेला पुढील टप्प्यावर न्या.
  • नियमित परतफेड न झाल्यास व्याज परतावा किंवा अनुदान रद्द होऊ शकते.
support_agent
सहाय्य हवे आहे?
हेल्पलाइन: 022-2620 2588 | ईमेल: info@vasantraonaikvimuktajati.org