योजना व कर्ज सुविधा

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजना

महामंडळाच्या मुख्य कंपनी तसेच उपकंपनींमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

या सर्व योजना महामंडळाच्या मुख्य कंपनी तसेच उपकंपनींमार्फत राबविण्यात येतात. प्रत्येक योजनेची स्वतंत्र पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अटी आहेत.

25% बीज भांडवल कर्ज योजना

स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बीज भांडवल सहाय्य योजना

योजनेचा तपशिल:

  1. राष्‍ट्रीयकृत बॅंका, जिल्‍हा अग्रणी बॅंका व जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंकाच्‍या माध्‍यमातून राब‍विण्‍यात येतात.
  2. महामंडळाचा सहभाग २५%
  3. बॅंकांचा सहभाग ७५% आहे.
  4. या योजनेमध्‍ये प्रकल्‍प मर्यादा रु. ५.०० लाख आहे.
  5. व्‍याजाचा दर ४% असून परतफेड कालावधी ५ वर्ष आहे.

अर्जदाराची पात्रता:

  1. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थी हा विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  3. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  4. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
  5. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:

  1. शाळेचा दाखला
  2. सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
  3. उत्‍पन्‍नाचा दाखला
  4. शिधा वाटप पत्रिका (रेशनिंग कार्ड)
  5. आधार कार्ड
  6. नागरीकत्‍व (Domicile Certificate) / रहिवाशी दाखला
  7. व्‍यवसाय व धंद्याचा परवाना
  8. व्‍यवसायाचे दरपत्रक (Quotation)
  9. व्‍यवसायाचे ठिकाण व जागेचा पुरावा भाडे पावती / करारपत्र किंवा मालकी हक्‍कचा पुरावा
  10. प्रकल्‍प अहवाल

अर्जाची प्रक्रिया:

  1. प्राथमिक अर्ज: जिल्हा कार्यालयात किंवा ऑनलाइन अर्ज सादर करा
  2. कागदपत्रे तपासणी: सादर केलेली कागदपत्रे तपासली जातात
  3. प्रकल्प मूल्यांकन: तज्ञांकडून प्रकल्प मूल्यांकन केले जाते
  4. बँक संदर्भ: मंजूर झाल्यास संबंधित बँकेकडे पाठवले जाते
  5. कर्ज मंजुरी: बँकेकडून अंतिम मंजुरी आणि रक्कम वितरण

पात्र व्यवसाय:

  • दुकान व्यवसाय (किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स)
  • सेवा व्यवसाय (रिपेअरिंग, हेयर कटिंग)
  • छोटे उत्पादन व्यवसाय
  • वाहतूक व्यवसाय (रिक्षा, टॅक्सी)
  • कृषी संबंधित व्यवसाय
  • हस्तकला व्यवसाय

संपर्क माहिती:

  • मुख्य कार्यालय: ०२२-२४२६७२०० ते २०३
  • ईमेल: info@vjnt.org
  • हेल्पलाइन: १८००-२३३-४४५५ (टोल फ्री)
  • कार्यालयीन वेळ: सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० (सोमवार ते शुक्रवार)
savings
बीज भांडवल कर्ज योजना
कमाल रक्कम: रु. ५.०० लाख
महामंडळाचा सहभाग: २५%
बॅंकेचा सहभाग: ७५%
प्रकल्‍प मर्यादा: रु. ५.०० लाख
व्याजदर: ४% वार्षिक
परतफेड कालावधी: ५ वर्षे

रु.१.०० लाख थेट कर्ज योजना

छोट्या व्यवसायांसाठी त्वरित कर्ज योजना

योजनेचा तपशिल:

  1. रु. १.०० लक्ष पर्यंत थेट कर्ज उपलब्‍ध
  2. महामंडळाचा सहभाग २५%
  3. लाभार्थीचा सहभाग निरंक असेल.
  4. ४८ हप्त्‍यात मुद्दल रु.२,०८५/- नियमित परतफेड करणा-या लाभार्थींना व्‍याज आकारण्‍यात येणार नाही.
  5. नियमित कर्जाची परतफेड न करणा-या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्‍ते थकीत होतील, त्‍या रकमेवर ४% व्‍याज आकररण्‍यात येईल.

अर्जदाराची पात्रता:

  1. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थी हा विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  3. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  4. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.
  5. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल, त्या व्यवसायाचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:

  1. शाळा सोडल्‍याचा दाखला/जन्‍माचा दाखला (वय मर्यादा १८ ते ५५ वर्षे असावी.)
  2. सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
  3. सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
  4. रेशन कार्ड झेरॉक्स
  5. आधार कार्ड झेरॉक्स
  6. रहिवासी दाखला/शासन मान्‍य स्‍वयम घोषणापत्र
  7. व्‍यवसायचे दरपत्रक (Quotation)
  8. व्‍यवसायाकरीता जागेचा पुरावा
  9. व्‍यवसायाचे ना-हरकत प्रमाणपत्र (आवश्‍यक असलेल्‍या व्‍यवसायाकरीता लागू)
  10. अर्जदारने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्‍यास त्‍याचा पुरावा घेण्‍यात यावा .
  11. महिला अर्जदार यांचे लग्‍न झाले असल्‍यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा माहेरच्‍या व सासरच्‍या नावांतील बदलाचे शपथपत्र.
account_balance
रु. १,००,०००/- थेट कर्ज योजना
कमाल रक्कम: रु. १.०० लाख
लाभार्थीचा सहभाग: निरंक (०%)
परतफेड कालावधी: ४८ हप्ते (मुद्दल: रु. २,०८५/- प्रति हप्ता)
व्याजदर: नाही (नियमित परतफेडीवर)
दंड व्याजदर: ४% (थकी हप्त्यांवर)

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना

रु.१५.०० लक्ष पर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा

योजनेचा तपशिल:

  1. शासनाकडून प्राप्‍त सहायक अनुदान रकमेतून महामंडळ ही योजना राबविते.
  2. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादाः- रु. १५.०० लक्ष पर्यंत.
  3. उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्‍ते भरल्‍यास, हप्‍ता भरल्‍यावर त्‍यातील व्‍याजाची रक्‍कम (१२ टक्‍केच्‍या मर्यादेत ) त्‍याचा आधार लिं‍क बॅंक खात्‍यात दरमहा महामंडळामार्फंत जमा करण्‍यात येईल. सदर योजना पुर्णपूणे संगणकीकृत असून प्रक्रीया सार्वजनिक वित्तीय व्‍यवस्‍थापन प्रणाली (पी एफ एम एस) अथवा तत्‍सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्‍यात येईल. महामंडळ केवळ बॅंकेने वेळेत वसूल केलेली योग्‍य व्‍याज रक्‍कम अदा करेल, या ऐवजी इतर कोणतेही Charges / Fees अदा करणार नाही.
  4. कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्‍याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
  5. महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य राहील. वेबपोर्टल - (www.vjnt.org)
  6. कर्ज परतफेडीचा कालावधी बॅंक निकषानुसार
  7. अर्जदाराने महामंडळाकडून सशर्त पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर करुन घ्यावे लागेल.
  8. अर्जदाराने मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही.
  9. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमीलेयरच्या मर्यादेत असावी.

अर्जदाराची पात्रता:

  1. लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  2. लाभार्थी हा विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  3. अर्जदार कोणत्याही बँकेचा, महामंडळाचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  4. कुटुंबातील एकाच व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:

  1. शाळा सोडल्‍याचा दाखला /वयाचा पुरावा (वय मर्यादा १८ ते ५0 वर्षे असावी.)
  2. सक्षम अधिका-याने दिलेला जातीचा दाखला
  3. सक्षम अधिका-याने दिलेला उत्‍पन्नाचा दाखला
  4. रेशनकार्ड झेरॉक्‍स
  5. आधार कार्ड झेरॉक्‍स
  6. नागरीकत्‍व (Domicile Certificate) / रहिवासी दाखला.
  7. व्‍यवसायाचे दरपत्रक (Quotation)
  8. वाहनसंदर्भात असल्‍यास लायन्‍संस/परवाना
  9. महिला अर्जदार यांचे लग्‍न झाले असल्‍यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा माहेरच्‍या व सासरच्‍या नावांतील बदलाचे अॅफेडिव्‍हीट जोडावे.
credit_score
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना
कमाल मर्यादा: रु. १५.०० लाख
व्याज परतावा: १२% पर्यंत (योग्य हप्ते भरल्यास)
परतफेड कालावधी: बॅंक निकषानुसार
नोंदणी: वेबपोर्टलवर अनिवार्य

गट कर्ज व्याज परतावा योजना

गट स्वयंरोजगारासाठी व्याज परतावा सुविधा

योजनेचे तपशील:

  1. शाळा सोडल्‍याचा दाखला (गटातील सदस्यांचे किमान वय मर्यादा १८ ते ४५ वर्षे असावी.)
  2. अर्जकर्त्‍यांने स्वतःचा व सदस्यांचा जातीचा दाखला
  3. अर्जकर्त्‍यांचे व सदस्यांचे कौंटूबीक वार्षिक उत्पन्न (रु.८ लाखाच्या मर्यादेत असल्याचे उत्पन्नाचा दाखला)
  4. अर्जकर्त्‍यांने स्वतःचा व सदस्याचा रहिवासी पुरावा / रेशनकार्ड झेरॉक्स / लाईट बिल
  5. अर्जकर्त्‍यांने स्वतःचा व सदस्याचे आधार कार्ड झेरॉक्स
  6. व्यवसायाचे दरपत्रक (Quotation)
  7. गटातील सदस्य संख्या ही किमान ५ असावी.
  8. सदर योजनेअंतर्गत (i) भागीदारी संस्था (ii) सहकारी संस्था (iii) बचत गट (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत संस्था असणे आवश्यक आहे.
  9. गटातील एकच “प्राधिकृत संचालक” प्रतिनिधीचे (ज्याचे mahaswayam.in वेबपोर्टलवर नोंदणी झालेली आहे.) महामंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित असेल व अशा अधिकार पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक राहील. हा संचालक प्रतिनिधी त्याच गटाचा लाभार्थी सदस्य असणे अनिवार्य आहे.

पात्रता:

  • सर्व सदस्य इतर मागासवर्गीय असावेत
  • गट नोंदणीकृत असावा
  • गटाचे नेतृत्व सक्षम असावे
  • साझा व्यवसाय योजना असावी

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे:

  1. शाळा सोडल्‍याचा दाखला (गटातील सदस्‍यांचे किमान वय मर्यादा १८ ते ४५ वर्षे असावे.)
  2. अर्जकर्त्‍यांचा स्‍वतःचा व सदस्‍यांचा जातीचा दाखला
  3. अर्जकर्त्‍यांचे व सदस्‍यांचे कौंटूबीक वार्षिक उत्‍पन्न (रु.८ लाखाच्‍या मर्यादेत असल्‍याचे उत्‍पन्नाचा दाखला )
  4. अर्जकर्त्‍यांने स्‍वतःचा व सदस्‍याचा रहिवासी पुरावा/रेशनकार्ड झेरॉक्‍स/लाईट बील
  5. अर्जकर्त्‍यांने स्‍वतःचा व सदस्‍याचे आधार कार्ड झेरॉक्‍स
  6. व्‍यवसायाचे दरपत्रक (Quotation)
  7. सदर योजनेअंतर्गत (i) भागीदारी संस्‍था (ii) सहकारी संस्‍था (iii) बचत गट (iv) एल.एल.पी. (v) कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्‍था व इतर शासन नोदणीकृत संस्‍था असणे आवश्‍यक आहे.

पात्र गट व्यवसाय:

  • महिला बचत गट
  • स्वयं सहायता गट
  • शेतकरी उत्पादक संघटना
  • हस्तकला गट
groups
गट कर्ज व्याज परतावा योजना
मर्यादा: रु. १०.०० लाख ते रु. ५०.०० लाख
व्याज परतावा: १२% पर्यंत (रु. १५.०० लाख मर्यादेपर्यंत)
नोंदणी: वेबपोर्टलवर अनिवार्य

योजनांसाठी अर्ज कसा करावा?

सर्व योजनांसाठी सामान्य अर्ज प्रक्रिया

description
अर्ज तयार करा

आवश्यक असलेला अर्ज डाउनलोड करून भरा किंवा ऑनलाइन अर्ज करा

folder
कागदपत्रे संकलित करा

आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संकलित करा आणि झेरॉक्स तयार करा

send
अर्ज सादर करा

जिल्हा कार्यालयात किंवा ऑनलाइन अर्ज सादर करा

track_changes
स्थिती तपासा

अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासा किंवा कार्यालयात संपर्क साधा